१ वर्षाच्या बाळाचा आहार | Diet Tips for 1 Year Old Child in Marathi | Dr Sangita Lodha

Dr Sangita Lodha30 September 20259:04903 views

About this video

१ वर्षाचे बाळ हे वाढीच्या अत्यंत नाजूक टप्प्यावर असते. या वयात शरीर आणि मेंदूची झपाट्याने वाढ होत असते, त्यामुळे बाळाला पोषणमूल्यांनी भरपूर, संतुलित आणि वयोगटानुसार योग्य आहार देणे खूप गरजेचे असते. या वयात बाळ फक्त दूधावर अवलंबून न राहता, घन आहार (solid food) देखील खायला लागतो. परंतु अनेक पालकांना या टप्प्यावर प्रश्न पडतात – काय खाऊ घालावे? किती वेळा खाऊ घालावे? कोणते पदार्थ टाळावेत? या व्हिडीओद्वारे डॉ. संगीता लोढा आपल्याला १ वर्षाच्या बाळासाठी योग्य आहार, आहारातील पोषणमूल्यांची गरजखाण्याचे प्रमाण आणि वेळा ,अन्नामुळे होणारे काही लक्षणं किंवा त्रास आणि योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर आणि समजण्यास सोप्या भाषेत मार्गदर्शन करणार आहेत.