थॅलेसेमिया: लक्षणे आणि उपचार | Thalassemia in Marathi | Symptoms & Treatment | Dr Sangita Lodha
About this video
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे, ज्यामध्ये शरीरात आरबीसी (लाल रक्तपेशी) पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत किंवा त्यामध्ये हीमोग्लोबिनची कमतरता असते. त्यामुळे रुग्णाला वारंवार रक्त चढवण्याची गरज भासते. हा आजार जन्मजात असून पालकांकडून अनुवंशिकतेमुळे पुढील पिढीत जातो. याचा परिणाम थकवा, अशक्तपणा, शरीराची वाढ खुंटणे, आणि विविध आरोग्यविषयक गुंतागुंतींमध्ये होतो. या व्हिडीओद्वारे डॉ. संगीता लोढा आपल्याला थॅलेसेमिया या आजाराची लक्षणं, निदान, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती देणार आहेत.